डॉ.विजय भटकर,डॉ. नरेंद्र जाधव,उज्ज्वल निकम यांना डॉक्टरेट प्रदान

मुंबई दि.२८  – ईटीएच लि.आणि सीडॅकचे माजी संचालक डॉ.विजय भटकर,अलकेमिस्ट मेडिकल डिव्हीजनचे अध्यक्ष आणि एआयआयएमएसचे माजी संचालक डॉ.पी.वेणुगोपाल,अर्थतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव आणि प्रख्यात वकील उज्जवल निकम यांना अलिकडेच पुण्याच्या डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले.माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते मान्यवरांना डॉक्टरेट देण्यात आली. 

डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभास कुलगुरु डॉ. पी. एन. राजपाल, निबंधक डॉ. बी. एस. माने उपस्थित होते. डॉ. पी. डी. पाटील यांनी पदवीदान समारंभात संबोधित केल्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणेचे कुलगुरु डॉ. पी. एन. राजदान यांनी विद्यापीठाचा विशेष अहवाल सादर केला.

Leave a Comment