आता मेक्सिकोमध्ये भूकंप

मेक्सिको सिटी दि.२८ – जगभरात विनाशकारी भुकंपाची मालिका सुरुच असून जपान आणि म्यानमारनंतर आता मेक्सिकोला भुकंपाचा जोरदार झटका बसला आहे.रविवारी दुपारी आलेल्या या भुकंपाची तीव्रता ५.८ रिश्टर स्केल इतकी होती.अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार मेक्सिकोतील चियापास राज्यातील सुचितेपासून १६ कि. मी. अंतरावर या भुकंपाचा केंद्रबिदू होता. या भुकंपामुळे कोणतीही जीवीत वा वित्तहानी झालेली नाही तसेच त्सुनामी येण्याची शक्यताही नाही.

Leave a Comment