जपानमधील किरणोत्सर्गात वाढ

टोकियो दि.२८ – जपानमधील धोकादायक ठरत चाललेया फुकुशिमा अणुप्रकल्पातून किरणोत्सर्ग आता अत्यंत गंभीर पातळीवर जाऊन पोहोचला आहे.पाण्यापेक्षा एक कोटीपट जास्त किरणोत्सर्ग या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचे टोकियो इलेक्ट्रिक पॉवर कंपनी अर्थात टेप्कोकडून सांगण्यात आले.दोन आठवड्यांपूर्वी झालेला भूकंप आणि त्यानंतर आलेल्या विनाशकारी त्सुनामीमुळे जपानच्या काही अणुभट्ट्यांत स्फोट झाले होते. जपानमध्ये भूकंप आणि त्सुनामीत आतापर्यंत २७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. फुकुशिमा येथील दुसऱ्या क्रमांकाच्या अणुभट्टीमध्ये प्रति क्यूबिक सेंटीमीटर पाण्यामागे २.९ अब्ज बेक्वेरिल्स इतका किरणोत्सर्ग होत आहे.

Leave a Comment