दमछाक करणाऱ्या कार्यक्रमामुळे विश्वकप स्पर्धेत अपयश

कोलंबो दि.२८ – दमछाक करणाऱ्या कार्यक्रमामुळे विश्वकप क्रिकेट स्पर्धेत अपयश आल्याचे इंग्लंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार अँड्यू स्ट्रास याने कोलंबो येथे सांगितले.उपांत्यपूर्व सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडचा १० गडी राखून दारुण पराभव केला होता.इंग्लंडचा संघ गेली सहा महिने घरापासून दूर असून सतत खेळत आहे. हीच दमछाक विश्वकप क्रिकेट स्पर्धेत आमच्या मुळावर आली,असे स्ट्रास याने सांगितले.

सहा महिन्यांचा कालावधी खूप मोठा असतो, असे सांगून स्ट्रास पुढे म्हणाला की, तीन महिने आम्ही ऑस्ट्रेलियात होतो. तिथे अॅशेस मालिकेत जिकण्यासाठी सर्वस्व पणास लावल्यानंतर थेट भारतीय उपखंडात आलो. दमछाक करणार्याय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामुळे विश्वकप स्पर्धेत चांगली कामगिरी करता आली नाही. अर्थात पराभवाचे हेच एकमेव कारण नाही. दमछाक हे अपयशाचे एक कारण असले तरी आम्ही एकूणच चांगला खेळ केला नाही. सर्वसामान्यपणे इंग्लंडला भारतीय उपखंडात चांगली कामगिरी करता येत नाही.

Leave a Comment