मुंबई : लवकरच येणार बोलके क्रेडीट कार्ड

मुंबई १६ मार्च – बोलणारे क्रेडीट कार्ड कधी पाहिले आहे का. आता मात्र बोलणार्याव क्रेडीट कार्डचा शोध लागला आहे. लंडन येथील डायनामिक्स इंक ही कंपनी असे कार्ड उत्पादित करीत आहे. हे कार्ड तुमच्या बँकेतील खात्यातील बॅलन्सही सांगेल.

चालू वर्षाच्या अखेरपर्यंत हे कार्ड अमेरिकेत लाँच करण्यात येणार आहे. या कार्डमध्ये अतिशय छोटे मायक्रोप्रोसेसर बसविण्यात येणार आहे. यात अतिक्षय सूक्ष्म अशी बॅटरी असेल. ही बॅटरी किमान तीन वर्ष काम देऊ शकेल. सिक्युरिटी कोड नोंदविल्यानंतर हे कार्ड व्यक्तिगत माहिती देवू शकेल. सिटी बँकेनेही २ जी कार्ड रिलीज केले आहे. यात एक प्रोग्रॅम केलेली मॅग्नेटीक चीप बसविण्यात आली आहे. कार्डाच्या समोरच्या बाजुला बटणे आहेत. सदर कार्डाची अद्याप चाचणी सुरु असून ती जर यशस्वी ठरली तर हे कार्डही क्रांती घडवेल. भविष्यात क्रेडीट कार्डच नव्हे तर अशा अनेक वस्तू अद्भुत स्वरूपात वापरावयास मिळतील, यात काही शंका नाही.

Leave a Comment