मुंबई : कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

मुंबई १५ मार्च – जपानमध्ये त्सुनामीच्या आपत्तीनंतर कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. नायमॅक्सवर कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल ९९ डॉलरवर आले आहेत. जपानमधील हाहाःकारानंतर तेथील कच्च्या तेलाच्या किंमती घटतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कच्चे तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये जपान जगात तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे मध्यपूर्व देशांमधील राजकीय परिस्थिती अजून बिघडणार नाही अशी शक्यता असल्यानेही कच्च्या तेलाचे दर खाली आले आहेत.

Leave a Comment