ऑस्ट्रेलिया : बदनाम ‘मुन्नी’ गिनीज बुकमध्ये

मेलबॉर्न १५ मार्च – मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकविणाऱ्या ‘बदनाम’ झालेल्या ‘मुन्नी’ चे नाव आता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये नोंदले गेले आहे.‘दबंग’ या हिदी चित्रपटात प्रसिध्द अभिनेत्री मलाईका अरोरा-खान हिच्या नृत्याने रंगलेल्या ‘मुन्नी बदनाम हुई’ या गीताने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. मेलबॉर्न येथे या गीतावर सुमारे १२०० लोकांनी तीन मिनिटे नृत्य केल्याने बदनाम ‘मुन्नी’ ने नाव गिनीज बुकात नोंदले गेले आहे.

‘भारतीय चित्रपट महोत्सव २०११’ च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मलाईकाच्या नेतृत्वाखाली बाराशे लोकांनी या गीतावर एकत्र नृत्य केले. या विक्रमाचे प्रमाणपत्र मलाईकाला देण्यात आले. यापूर्वी सिगापूरमध्ये १००८ लोकांनी एकाच गाण्यावर नाच करुन विक्रम केला होता. मलाईका व इतर सहकाऱ्यांनी हा विक्रम मोडला आहे.

Leave a Comment