मुंबई : डांबर निर्यातीत वाढ

मुंबई १५ मार्च – भारतातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य असले तरी आपण डांबर मोठ्या प्रमाणावर निर्यात करुन परदेशातील रस्ते गुळगुळीत करण्यास मदत करतो. भारतातून २००५-०६ या आर्थिक वर्षी ५ कोटी ५३ लाख रुपयांचे डांबर निर्यात झाले. २००६-०७ या आर्थिक वर्षात ३९ कोटी ६ लाख रुपये, २००७-०८ या आर्थिक वर्षात १५ कोटी ४२ लाख रुपये, २००८-०९ या आर्थिक वर्षात ३ कोटी ७२ लाख रुपये व २००९-१० या आर्थिक वर्षात ११ कोटी ५९ लाख रुपये असे डांबर निर्यात झाले. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून २०१० या कालावधीत २१ कोटी ५ लाख रुपयांचे डांबर निर्यात झाले आहे.

Leave a Comment