नवी दिल्ली : टाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत वाढ

नवी दिल्ली १५ मार्च – देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या फेब्रुवारी महिन्यातील जागतिक वाहनविक्रीत १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. व्यापारी वाहने तसेच पॅसेंजर वाहनांच्या विक्रीमध्ये भरीव वाढ झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. लक्झरी ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जग्वार अँड लँड रोव्हरची विक्री २६ टक्क्याने वाढून २१ हजार ६५३ इतकी झाली.

जग्वार ब्रँडची विक्री दोन टक्क्याने वाढून ३२१३ इतकी झाली तर लँड रोव्हरची विक्री ३३ टक्क्याने वाढून १८ हजार ४४० इतकी झाली. पॅसेंजर वाहनांची विक्री १८ टक्क्याने वाढून ५५ हजार ६६४ इतकी झाली.

Leave a Comment