मुंबई : मारुती सुझुकीची एक कोटीवी मोटरकार बाजारात

मुंबई १५ मार्च – देशातील सर्वात मोठी मोटरकार कंपनी मारुती सुझुकीने आपली एक कोटीवी कार मंगळवारी उत्पादित केली.अशा प्रकारची कामगिरी मारुती ही देशातील पहिलीच कंपनी आहे.मेटॅलिक ब्रीझ ब्ल्यू रंगाची वॅगन आर व्हीएक्सआय ही मारुतीची एक कोटी क्रमांकाची कार ठरली.तिचा चेसीस क्रमांक २४३८९९ इतका आहे.कंपनीच्या गुडगाव येथील प्रकल्पातून ही कार बाहेर आली.

जगातील काही मोजक्या कंपन्यांनी आतापर्यंत एक कोटी मोटरकारची निर्मिती केली आहे. त्यामध्ये आता मारुती सुझुकीचा समावेश झाला आहे. याप्रसंगी बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिन्झो नाकानिशी म्हणाले की, अशी कामगिरी करीत असताना आम्ही संस्थापक भागीदारांचे आभार मानू इच्छितो. मुल्ये आणि अनुभवावर आधारित सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केल्यानेच कंपनीला अशी कामगिरी करता आली आहे. ग्राहकांचीही मोलाची साथ आम्हाला लाभली आहे. कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न आणि वितरकांचे सहकार्यदेखील विसरता येणार नाही. मारुती सुझुकी कुटुंबियांसाठी आजचा दिवस अतिशय मोलाचा आणि अभिमानाचा आहे.

Leave a Comment