नाशिक : मालेगावातील छाप्यात ८०० लिटर रॉकेल जप्त

मालेगाव ८ मार्च – येथील इस्लामपुरा भागात शहर पोलिसांनी रविवारी रात्री टाकलेल्या छाप्यात ८०० लिटर रॉकेल जप्त करण्यात आले आहे. इस्लामपुरा भागात रफीक अहमद याच्याकडे रेशनिगवरील रॉकेल विक्रीचा परवाना आहे. त्याने फेब्रुवारीपर्यंत रॉकेलची विक्री केल्याचे कागदोपत्री दाखविले होते. परंतु, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ८०० लिटर रॉकेल आढळून आले. या रॉकेलबाबत त्याला खुलासा करता न आल्याने पोलिसांनी रफीक अहमद याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment