पुणे : हसन अली चौकशीसाठी ताब्यात

पुणे ८ मार्च – घोड्याचा व्यापारी हसन अली याला सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी पुण्यातील निवासस्थानातून ताब्यात घेतले.हसन अलीच्या पुण्यातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी छापा घातला. त्याला अधिक चौकशीसाठी दुपारी मुंबईला नेण्यात आले.

हसन अली याने ५० हजार कोटी रुपयांचा कर चुकविला आहे. यावरुन अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते. हसन अलीला अद्याप अटक का झालेली नाही, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. तसेच या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय योग्य पध्दतीने चौकशी करीत नाही, असा शेरा न्यायालयाने मारला होता. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हसन अलीच्या पुणे आणि कोलकाता येथील निवासस्थानी छापे घातले. तसेच अलीच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानीही छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment