सचिनच्या गुडघ्याला दुखापत, एमआरआय स्कॅनिग करुन घेतले

मुंबई, २१ फेब्रुवारी – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या गुडघ्याला दुखापत झाली असून त्याने गुडघ्याचे एमआयआर स्कॅन करुन घेतले आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे, याचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. बांगलादेशविरुध्दच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर रविवारी रात्री भारतीय संघ मुंबईत दाखल झाला. यावेळी सचिन तेंडुलकरने लीलावती रुग्णालयात जाऊन गुडघ्याचे एमआरआय स्कॅन करुन घेतले. स्कॅनमध्ये दुखापत गंभीर नसल्याचे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. भारताचा पुढील सामना बंगलोरमध्ये २७ फेब्रुवारी रोजी इंग्लंडसोबत होत आहे

Leave a Comment