सोलापूर : राज्य मसापवर सोलापूरच्या दोघांची बिनविरोध निवड

मोहोळ, ११ फेब्रुवारी – महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून अॅड. जे. जे. कुलकर्णी व पद्माकर कुलकर्णी यांची बिनविरोध निवड झाली आहे. मसापच्या कार्यकारिणीवर २०११ ते  २०१६ या कालावधीसाठीच्या निवडणुकीत सोलापुरातून दोनच अर्ज प्राप्त झाले होते.

निवडणूक निर्णय अधिकारी मेधा सिधये, प्र. ल. गावडे व श्री. वि. सहस्त्रबुद्धे यांनी पुणे येथे या निवडी जाहीर केल्या. अॅड. जे. जे. कुलकर्णी यांनी यापूर्वी १९९५ ते १९९८ या काळात मसापमध्ये जिल्ह्याचे नेतृत्व केले होते.  तर पद्माकर कुलकर्णी यांची महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर सलग दुसर्यांमदा निवड झाली आहे. आजीव संख्या ५०० हून अधिक झाल्याने प्रथमच जिल्ह्यातून २ प्रतिनिधी निवडून गेले आहेत. मसाप सोलापूर शाखेच्या सदस्यांनी नूतन राज्यकार्यकारिणी सदस्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले.

Leave a Comment