कलमाडींच्या स्वीय सचिवास अटक

पुणे: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संयोजनातील भ्रष्टाचार प्रकरणी संयोजन समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुण्यातील स्वीय सहाय्यकाला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने आज सकाळी अटक केली.
     कलमाडी यांच्या निवासस्थाने आणि व्यावसायिक आस्थापानांबरोबर त्यांच्या स्वीय सहाय्यकांची कार्यालये आणि निवासस्थाने या ठिकाणी नुकतेच छपे घातले होते. कलमाडी यांची दिल्ली येथे चौकशीही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज कलमाडी यांचा स्वीय सहाय्यक शेखर शेखर देवरुखकर याला आज सीबीआयच्या पथकाने अटक करून न्यायालयात हजर केले. चौकशीसाठी त्याला दिल्ली येथे नेले जाणार असल्याने न्यायालयाने दि. १४ पर्यंत त्राझीत कस्टडीद्वारे सीबीआयच्या ताब्यात दिले आहे. त्यानंतर दिल्ली न्यायालयात हजर करून त्याला सीबीआय कोठडीत घेण्यात येईल.

Leave a Comment