कात्रज दुध महागले

पुणे: महागाईचा भडका उडालेला असतानाच शासकीय स्तरावरून दुधासारख्या दैदंदिन गरजेच्या पदार्थाची भाववाढ केली गेल्यापाठोपाठ सहकारी दूध उत्पादक संघानीही दुधाचे दर वाढविण्यास सुरुवात केली आहे. कात्रज दूध महासंघानेही आज दुधाच्या विक्रीदरात ३ रुपयांची दरवाढ जाहीर केली असून त्याची अंमलबजावणी दि. १६ पासून होणार आहे.
     कात्रज दूध महासंघाची बैठक आज पार पडली. या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलचे दर वाढल्यामुळे वाहतूक खर्चात होणारी वाढ लक्षात घेता ही दरवाढ अटळ असल्याचे महासंघाचे अध्यक्ष रामभाऊ तुळे यांनी स्पष्ट केले. यापूर्वी शासनाने दूध खरेदीचे दर वाढविण्या आधीच महासंघाने खरेदीचे दर वाढविले आहेत. मात्र इंधन दरवाढीमुळे विक्रीचे दर वाढविणे अनिवार्य असल्याचे ते म्हणाले. या दरवाढीमुळे ‘कात्रज’चे गाईचे दूध २९ रुपये प्रति लिटर तर म्हशीचे दूध ३६ रुपये प्रतिलिटर दराने ग्राहकांना घ्यावे लागणार आहे.

Leave a Comment