एचटीसीने लाँच केला लाखमोलाचा स्मार्टफोन!

htc
नवी दिल्ली – एचटीसीने आपला लाखमोलाचा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन पूर्णपणे सोन्याचा आहे. एचटीसी-१ सह याच व्हर्जनचा एचटीसी-१ गोल्डजिनी स्मार्टफोन बाजारात दाखल झाला झाला आहे. २४ कॅरेट सोन्याने तयार करण्यात आलेल्या फोनची किंमत १ लाख ६० हजार ८३३ रूपये इतकी आहे.

एचटीसी आधी आय फोन ५ एस, गोल्ड ब्लॅकबेरी, गोल्ड आय पॅड एअर आणि आय पॅड मिनी रेटीना हे गोल्डन सिरीजचे फोन बाजरात उपलब्ध आहेत.
गोल्ड शिवाय एचटीसी-१ हा प्लॅटिनम आणि रोझ गोल्ड प्लेटिंगमध्ये देखील उपलब्ध आहे. एचटीसी-१ प्लॅटिनमची किंमत १ लाख ७७ हजार ८३३ रूपये इतकी आहे.
एचटीसी-१ हा सिम फ्री स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन सर्व नेटवर्कसाठी उपलब्ध आहे. ग्राहक या फोनला कुठल्याही देशात कुठल्याही नेटवर्कवर वापरू शकतात. अशी माहिती गोल्डजिनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर मिळत आहे.