आता १२८ जीबीचे मेमरी कार्ड

memorycard
नवी दिल्ली – सॅनडिस्क या कंपनीने १२८ जीबीचे मेमरी कार्ड लाँच केले आहे. हाय मेमरी स्मार्टफोनला हे मेमरी कार्ड सपोर्ट करते. सॅमसंग गॅलेक्सी एस ५ आणि एचटीसी एम ८ सारखे हाय मेमरी असलेले स्मार्टफोन भारतात लाँच झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘स्कॅनडिस्क’ने १२८ जीबीचे मेमरी कार्ड लाँच केले आहे. प्रत्येक हाय मेमरी स्मार्टफोनला हे मेमरी कार्डसपोर्ट करते.

‘स्कॅनडिस्क’च्या या कार्डची किंमत ९,९९९ रुपये इतकी आहे. या मेमरी कार्डच्या किंमतीत एक स्मार्टफोन येऊ शकतो. त्यामुळे हे मेमरी कार्ड खरेदी करणे बहुतेक युजर्सला परवडणार नाही. परंतू गॅलेक्सी एस ५ आणि एचटीसी एम ८ सारखे महागडे फोन खरेदी करणारे युझर्स या मेमरी कार्डसाठी १० हजार रुपये सहज खर्च करू शकतात.
या मेमरी कार्डमध्ये १६ तासांचा फुल एचडी व्हिडिओ स्टोअर करू शकतो. याशिवाय ७५०० गाणी, ३२०० फोटोज आणि १२५ अॅप्स सेव्ह केल्या जाऊ शकतात.