१०८ मेगापिक्सलचा कॅमेरा बॉल

ballस्मार्टफोन, टॅब्लेट, टिव्ही अशा उपकरणांची दररोज नवी सुधारित आवृत्ती बाजारात आणली जात असताना कॅमेरा क्षेत्रही त्यात मागे राहिलेले नाही. अॅपलने पॅनोरामा शॉट लाँच केल्यानंतर गुगलने त्याला स्पर्धा म्हणून फोटास्पीयर लाँच केला होता. आता मात्र त्यापुढचे एक पाऊल टाकले गेले आहे. तब्बल १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा बॉल लवकरच बाजारात येत असून त्याचे प्री ऑर्डर बुकींग सुरू झाले आहे. या बॉलची किंमत आहे ५४९ डॉलर्स म्हणजे ३२९८९ रूपये.

हा कॅमेरा बॉल ३६० अंशात फिरतो आणि हव्या तशा प्रतिमा शूट करू शकतो. यात ३६ कॅमेरे अंतर्भूत केले गेले आहेत आणि हे सर्व कॅमेरे एकसारखेच काम करतात व त्यांच्या एकत्र क्षमतेमुळे त्याला १०८ मेगापिक्सलची पॉवर प्राप्त होऊ शकते असे उत्पादकांचे म्हणणे आहे. पॅनोमो डॉट कॉम वर या कॅमेर्‍यासाठी ऑर्डर देता येणार आहे.