
जगभरातील तमाम पब्लीक सेल्फी म्हणजे स्वतःचा फोटा स्वतःच काढायच्या ट्रेंडने अगदी पागल झाले आहे.भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीही त्याला अपवाद नाहीत. मोबाईल अथवा डिजीकॅमचा वापर करून आपणच आपले फोटो काढणे सोपे असले तरी चांगला फोटो येण्यासाठी बरेच फोटो काढावे लागतात. सेल्फीचा हा ट्रेंड पाहून ऑक्सफर्ड डिक्शनरीने हा शब्द त्यांच्या शब्दकोशात समाविष्ट करून घेतला आहे.
सॅमसंगच्या सेल्फी एनएक्स मिनीची बाजारात एंट्री
मोबाईल दुनियेत क्रांती घडविणार्याब सॅमसंगने या ट्रेंडचा फायदा अचूक करून घेताना खास सेल्फी दिवान्यांसाठी एनएक्स मिनी हा कॅमेरा बाजारात आणला असून तो पाच आकर्षक रंगात उपलब्ध आहे. अतिशय सडपातळ, वजनाला हलका, मेटॅलिक बॉडी, त्यावर लेदर फिनिश, स्टायलिश असलेल्या या कॅमेर्याला २०.७ मेगापिक्सलची क्षमता दिली गेली आहे. तीन इंची स्क्रीन असलेल्या या कॅमेर्यातून तीन वेगळ्या मोडमधून म्हणजे बटण क्लीक, टच क्लिक आणि विक क्लिक म्हणजे केवळ पापणी फडकावून फोटो काढता येतात.
या कॅमेर्याचा वेग इतका आहे की उडत्या वस्तूंचे फोटोही त्यातून काढता येतात. याला वायफाय सुविधा आहे शिवाय बॅटरी एकदा चार्ज केली की १९० मिनिटांचे व्हिडीओ शूटिग किवा ६५० फोटो काढता येतात आणि ते अन्य उपकरणांवर ट्रान्स्फरही करता येतात.या कॅमेर्याचे वजन केवळ १५३ ग्रॅम इतकेच आहे.
