
मुंबई – रिझर्व्ह बँकेने नविन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. त्यानुसार आता दहा वर्षांवरील मुलेही स्वतंत्रपणे बँक खात्याचे व्यवहार करु शकणार आहेत. आर्थिक सर्वसमावेशकता आणि बचतीला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
10 वर्षावरील मुलांना बँकेचे व्यवहार करण्यास मुभा
रिझर्व्ह बँकेने याआधी सज्ञान नसलेल्या मुलांना बचत तसेच मुदत ठेव खाती उघडण्यासाठी परवानगी दिली होती. यासाठी मुलांच्या आईला पालक म्हणून खात्यावरील व्यवहार करण्याचे अधिकार आहेत. आता मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करत सर्व दहा वर्षांवरील मुलांना आपल्या पालकांच्या किंवा कायद्यानुसार नेमणूक केलेल्या पालकांच्या व्दारे बचत आणि मुदत खाती उघडता येणार आहेत.
तसेच ज्या मुलांना दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, ते स्वःता बचत खाते उघडून स्वतंत्रपणे व्यवहारही करू शकतात. यामध्ये एटीएम कार्ड आणि चेकबूकचाही समावेश आहे. मात्र, जोखीमी दृष्टीनेच्या वयानुसार मर्यादा आखणे आणि किती रकमेचा व्यवहार करता येईल याबाबतीत निर्णय घेणे, हे ज्यात्या बँका ठरवू शकतात, असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.
