
महात्मा गांधी सिरीज २००५ मधल्या १ हजाराच्या नव्या नोटा लवकरच चलनात येत असून त्यावर गव्हर्नर रघुराम राजन यांची सही असेल असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. रूपयाचे नवे चिन्ह असलेल्या या नोटेचे प्रिटींगचे वर्ष २०१४ आहे. हे वर्ष नोटेच्या मागच्या बाजूस छापले गेले आहे. रघुराम राजन यांच्या सहीने येणार्या या पहिल्याच नोटा आहेत.
रघुराम राजन यांच्या सहीच्या १ हजाराच्या नोटा लवकरच
या नोटेचे डिझाईनही महात्मा गांधी सिरीज २००५ च्या नोटेप्रमाणेच आहे. अर्थात नव्या नोटा चलनात आल्या तरी पूर्वीच्या नोटाही चलनात राहणार आहेत असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
