बिल गेटसची मायक्रोसॉफ्टवरची मालकी संपुष्टात येणार

gates
मायक्रोसॉफ्ट कार्प या नामवंत कंपनीचे माजी प्रमुख, चेअरमन बिल गेटस यांनी कंपनीतील भागीदारी येत्या चार वर्षात म्हणजे २०१८ पर्यंत संपुष्टात येईल असे सांगितले जात आहे. बिल गेटस ज्या प्रमाणात त्यांच्याकडील शेअर्सची विक्री करत आहेत ते पाहता येत्या चार वर्षात ते कंपनीचा हिस्सा राहणार नाहीत.

पर्सनल कॉम्प्युटिंग मध्ये क्रांती घडविलेल्या मायक्रोसॉफ्टची स्थापना बिल यांनी त्यांचा शालेय सहकारी पॉल अॅनल सोबत १९७५ साली केली. १९८६ सालात गेटस यांच्याकडे कंपनीचे ४९ टक्के शेअर्स होते. आणि त्यामुळेचे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून गेली अनेक वर्षे गेटस प्रथम क्रमांकावर आहेत. मात्र कंपनी स्थापतानाच केलेल्या पॅटर्नप्रमाणे बिल गेटस गेली बारा वर्षे दर तिमाहीत २० दशलक्ष शेअर्स विकत आहेत. या आठवड्यातही अशी विक्री केल्यानंतर आता त्यांच्याकडे ३३० दशलक्ष शेअर्स शिल्लक आहेत आणि येत्या ४ वर्षात ते विकलेही जाणार आहेत.

बिल यांचा सहकारी व माजी सीइओ बालमेरकडे कंपनीची धुरा २००० साली सोपविली गेली होती. तोही आता निवृत्त झाला आहे. मात्र त्याच्याकडच्या शेअरचा वाटा ३३३ दशलक्ष असल्याने बिलपेक्षाही त्याच्याकडे जास्त शेअर्स आहेत. सध्या कंपनीची धुरा सत्या नडेला यांच्याकडे आहे बिल यांनी त्यांचे सर्व लक्ष बिल मलिडा फौंडेशनकडे केंद्रीत केले आहे. आजही बिलची संपत्ती ७७ अब्ज डॉलर्स इतकी असून ते आजही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.