किर्लोस्कर ब्रदर्स महिला कामगार लिम्का बुकमध्ये

kirloskar
कोईमतूर येथील किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या संपूर्ण महिला कामगार असलेल्या कारखान्याने मिशन महिला २० साठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये स्थान मिळविले आहे. पंप बनविणार्‍या या कंपनीतील महिला कामगारांनी १७.२५ सेकंदात पंप असेंबल करून दाखविण्याचे राष्ट्रीय रेकॉर्ड यशस्वी केल्यामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने त्यांची नोंद घेतली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष महिला सशक्तीकरणासाठी समर्पित आहे. कंपनीचे प्रमुख डॉ. आर. व्ही .राजकुमार यांचा या निमित्ताने लिम्का कडून सन्नान करण्यात आला.

किलोस्कर ब्रदर्सचे अध्यक्ष संजय किलोस्कर या संदर्भात बोलताना म्हणाले की आमच्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे.महिला सबलीकरणासाठी कंपनीकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना या सन्मानामुळे मान्यता मिळाली आहे. आमच्या कोईमतूर युनिटने यापूर्वीही असे अनेक विक्रम करून आमची ध्येये साध्य केली आहेत. आमच्या कंपनीतील महिला कर्मचार्‍यांमुळेच आमचे पंप असेंबल करण्यासाठी लागणारा वेळ ६० सेकंदांवरून २० सेकंदावर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहेात. कोईमतूर येथील कंपनीत दर महिन्याला ३४ हजार पंपांचे उत्पादन केले जाते.