स्कोडा भारतात उभारणार मेट्रो बोगी कारखाना

metro_0
चेकोस्लोव्हाकियाची वाहन कंपनी स्कोडा भारतात व्यवसाय विस्ताराच्या विचारात असून येथे मेट्रो रेलच्या बोगी बनविण्याचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे समजते. चेकोस्लोव्हाकीयाचे भारतातील राजदूत मिलोस्लाव्ह स्तारेक यांनी कंपनीचा भारतात कारखाना सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात आला असल्याची माहिती दिली.

इइपीसी इंडियाने दिलेल्या जाहिरातीनुसार स्कोडा ट्रान्स्पोर्टेशन प्रकल्पासाठी जागेचा शोध घेत असून त्यांना कारखाना उभारणीसाठी योग्य जागा हवी आहे. दिल्ली मेट्रोच्या बोगी याच कंपनीने तयार केल्या आहेत मात्र त्या आयात करण्यात आल्या होत्या. आता जयपूर, कोचीन, बंगलोर, लखनौ आणि मुंबईत मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले असल्याने मेट्रोच्या बोगी भारतातच बनविण्याचा कंपनीचा विचार आहे.