१० रूपयाच्या प्लॅस्टीक नोटांसाठी करावी लागणार प्रतीक्षा

10notes
दिल्ली – रिझर्व्ह बँकेने १० रूपयांच्या प्लॅस्टीकच्या नोटा बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले असले तरी या नोटा प्रत्यक्षात बाजारात येण्यासाठी आणखी कांही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे समजते. देशातील पाच शहरात प्रायोगिक तत्वावर या नोटा जारी करण्यात येतील असे बँकेतर्फे फेब्रुवारीत संसदेला सांगितले गेले होते. या पाच शहरात कोची, जयपूर, दिल्ली, सिमला आणि भुवनेश्वर यांचा समावेश होता.

रिझर्व्ह बँकेतील वरीष्ठ अधिकार्‍याकडून मिळालेल्या माहितीनुसार या नोटा छापण्यासाठी आवश्यक साम्रगीसंदर्भात निविदा मागविल्या गेल्या होत्या. मात्र ज्यानी या निविदा भरल्या ते प्रायोगिक आधारावर नोटांसदर्भातले मानदंड पुरे करू शकले नाहीत. त्यामुळे निविदा मागविण्याची प्रक्रीया पुन्हा करावी लागणार आहे. यामुळे या नोटा जारी होण्यास विलंब होणार आहे.