
पिपल्स लिबरेशन आर्मी ऑफ चायनाने बिजिंग येथील लष्करी विमानतळाच्या सुरक्षेसाठी वानरसेना तयार केली असून या माकडांना सुरक्षेचे प्रशिक्षण दिले गेले असल्याचे समजते. या वानरसेनेची मदत प्रामुख्याने विमानतळावर होणारा पक्ष्यांचा उपद्रव टाळण्यासाठी केला जाणार आहे. लष्कराच्या वेबसाईटवर त्याची माहिती दिली गेली आहे.
चीनी लष्करी विमानतळांच्या सुरक्षेसाठी वानरसेना
लढावू विमानांची उड्डाणे होत असताना किंवा ही विमाने लँड करत असताना अनेकदा पक्ष्यांच्या धडका बसल्याने विमानांना नुकसान होते. अनेकदा विमाने अपघातग्रस्त होतात. त्यामुळे येथे तैनात करण्यात आलेल्या वानरसेनेला आसपास असलेल्या झाडांवर असलेली पक्ष्यांची घरटी नष्ट करणे आणि पक्षांच्या झुंडीना रनवेवर येण्यापासून थांबविणे अशी कामे दिली गेली आहेत. वेबसाईटवर ही माहिती वाचणार्या अनेक युजरनी चिनी सेनेचे गुप्त हत्यार असा या वानरसेनेचा उल्लेख केला आहे.
अर्थात लष्करी कामासाठी प्राण्यांचा वापर करणारा चीन हा पहिला देश नाही.अमेरिकी सेनेनेही समुद्रातील सुरूंग शोधण्यासाठी डॉल्फीन माशाचा उपयोग केला आहे.
