युरोपिय संघाची हापूस आंब्यावर २० महिने बंदी

alpanso
युरोपिय संघाने भारतातून आयात केल्या जाणार्‍या हापूस आंब्यावर तसेच वांगी, कारली, दुधी आणि आरवी या भाज्यांवर १ मे पासून बंदी घातली असून ही बंदी २० महिन्यांसाठी आहे. त्यानंतर या निर्णयाबाबत ३१डिसेंबर २०१५ ला पुन्हा विचार केला जाईल असे युरोपिय संघ स्टँडिग कमिटीने जाहीर केले आहे.

भारतातून २०१३ सालात पाठविल्या गेलेल्या हापूस आंब्यात व भाज्यांमध्ये फ्रूट फ्लाय व अन्य किड आढळल्यानंतर युरोपिय संघाने हा निर्णय घेतला आहे. तेथील पर्यावरण विभागाच्या अहवालानुसार या किडींमुळे या देशांच्या सॅलड उद्योगावर संकट येण्याचा धोका आहे. भारतातून दरवर्षी युकेला १.६ कोटी आंबे निर्यात केले जातात व त्यातून ६० लाख पौंड मिळतात. युकेतील सॅलड उद्योग ३२ कोटी पौंडांचा असून तो अडचणीत येऊ नये म्हणून ही बंदी घातली गेली आहे. ब्रिटन भारतीय आंब्यासाठी मोठे मार्केट आहे.