
सनी देओलसोबत ‘गदर 2’ बनवणारे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी काही काळापूर्वी ‘वनवास’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात अनिल शर्मा यांचा मुलगा आणि ‘गदर 2’मध्ये चरणजीतची भूमिका साकारणारा अभिनेता उत्कर्ष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलरची सुरुवात त्याच्या एका व्हॉईसओव्हरने होते.
Vanvaas Trailer: ‘अपने ही देते हैं अपनों को वनवास…’ ‘गदर 2’ दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
उत्कर्ष शर्मा म्हणतो, “माता-पिता का कर्म होता है बच्चों को पालना. और बच्चों का धर्म होता है मां-बाप को संभालना.” बनारसच्या गल्लीबोळात तुम्हाला उत्कर्षची खेळकर शैली पाहायला मिळेल. या चित्रपटात तो वीरू भैय्या स्वयंसेवकाची भूमिका साकारत आहे. सुरुवातीला त्याचे पात्र खूपच मनोरंजक वाटते. तो म्हणतो की त्याच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. मात्र, लोकांचे प्रश्न सोडवताना तो आपला खिसा रिकामा करतो. मात्र, ही चित्रपटाची कथा नसून लोकांना हसवण्यासाठी अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
या चित्रपटाची कथा अशा लोकांवर आधारित आहे, जे आपल्या मुलांना वाढवतात, पण मुले मोठी झाल्यावर आई-वडिलांना घराबाहेर काढतात. नाना पाटेकर अशाच एका व्यक्तीची भूमिका साकारत आहेत, ज्याला त्याच्या मुलांनी सोडून दिले आहे आणि त्यानंतर वीरू भैया म्हणजेच उत्कर्ष त्याच्या आयुष्यात येतो, त्यानंतर ही कथा भावूक बनते. हा ट्रेलर तुम्हाला सुरुवातीला हसवतो, पण शेवटी भावूक करतो.
हा चित्रपट एक अशी कथा दाखवणार आहे, ज्यात मुले त्यांच्या पालकांना रस्त्यावर सोडतात, म्हणून त्याचे नाव ‘वनवास’ ठेवण्यात आले आहे. ट्रेलरच्या शेवटी, नाना पाटेकर यांची एक ओळ आहे, “अपने ही अपनों को देते हैं वनवास”, ज्यामध्ये त्यांनी अशा व्यक्तीची वेदना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जो त्यांच्या मुलांद्वारे स्वतःपासून विभक्त झाला आहे. मात्र, आता हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये किती चांगली कामगिरी करतो, हे पाहायचे आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहेत.
