
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज बनला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या ICC कसोटी क्रमवारीत, जसप्रीत बुमराहने दोन गोलंदाजांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला. याआधी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा अव्वल स्थानावर होता. जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर होता, पण पर्थमधील त्याच्या अप्रतिम कामगिरीनंतर बुमराहने या दोघांनाही मागे टाकले आणि नंबर 1 गोलंदाज होण्याचा मुकुट पटकावला.
Test Rankings : जसप्रीत बुमराह पुन्हा बनला नंबर 1 गोलंदाज, 2 खेळाडूंना एकत्र पछाडले
ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह 883 रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा रबाडा 872 रेटिंग गुणांसह दुसऱ्या, तर जोश हेजलवूड 860 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑफस्पिनर आर अश्विन चौथ्या स्थानावर आहे. 30 ऑक्टोबर रोजी जसप्रीत बुमराहचे नंबर 1 रँकिंग हिरावले गेले होते. त्याच्या जागी रबाडाने ते स्थान गाठले होते. पण 27 दिवसांतच बुमराहला पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळाले आहे.
"I ONLY BELIEVE IN JASSI BHAI, BECAUSE GAME-CHANGER PLAYER IS ONLY ONE 𝗝𝗔𝗦𝗣𝗥𝗜𝗧 𝗕𝗨𝗠𝗥𝗔𝗛" – all of 🇮🇳 rn!
☝ Usman Khawaja
☝ Steve SmithWatch #AUSvINDonStar 👉 LIVE NOW on Star Sports 1! #ToughestRivalry pic.twitter.com/9TdBbs3T8J
— Star Sports (@StarSportsIndia) November 22, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराह ज्या फॉर्ममध्ये दिसत आहे, ते पाहता या खेळाडूला पहिल्या क्रमांकावरून हटवणे केवळ कठीणच नाही, तर अशक्य आहे. पर्थ कसोटीत बुमराहने एकूण 8 विकेट घेतल्या, त्यापैकी पहिल्या डावात त्याने 5 विकेट घेतल्या. पर्थमध्ये अवघ्या 150 धावांत आटोपलेल्या टीम इंडियाने केवळ बुमराहच्या जोरावर पुनरागमन केले.
या उजव्या हाताच्या फलंदाजाने दिग्गज फलंदाजांनी सुसज्ज असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंग युनिटला उद्ध्वस्त केले होते आणि कांगारूंना त्यांच्याच घरी 295 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. आता बुमराहला कसोटी मालिकेत आणखी 4 सामने खेळायचे आहेत आणि त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली, तर त्याला पहिल्या क्रमांकावरून कोणीही हटवू शकणार नाही.
