
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. 25 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाज 1992 नंतर प्रथमच खेळल्या जात असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पदार्पण करताना दिसू शकतो. तो उस्मान ख्वाजासोबत संघाच्या दुसऱ्या सलामीवीराची भूमिका बजावू शकतो. मात्र, ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. पण, 25 वर्षीय नॅथन मॅकस्वीनला ओपनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
हा फलंदाज भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियासाठी करू शकतो कसोटी मालिकेत पदार्पण, उस्मान ख्वाजासोबत येणार सलामीला!
उजव्या हाताचा फलंदाज नॅथन मॅकस्वीनची ऑस्ट्रेलियन संघात कसोटी सलामीवीर म्हणून निवड होण्याची शक्यता बळावली आहे, कारण रिकी पाँटिंगनेही त्याच्या नावाची वकिली केली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा आणखी एक माजी कर्णधार टीम पेन नेटमध्ये स्वत: त्याचा सराव घेताना दिसला.
https://x.com/DanielCherny/status/1853596786801442915?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1853596786801442915%7Ctwgr%5E2e53f8b26b432e07b0d0198c4b7a23bc6a5000be%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fricky-ponting-has-backed-nathan-mcsweeney-to-partner-usman-khawaja-at-the-top-in-test-series-against-india-2926720.html
रिकी पाँटिंगने नॅथन मॅकस्वीनच्या नावाची वकिली करण्याचे कारण म्हणजे भारत अ विरुद्धच्या पहिल्या अनधिकृत कसोटीतील त्याची कामगिरी. 25 वर्षीय फलंदाजाने भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व केले आणि विजयाकडे नेले. त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या सामन्याच्या दोन्ही डावात तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. नॅथन मॅकस्वीनने पहिल्या डावात 39 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने 88 धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला विजय मिळवून देऊनच तो माघारी परतला.
भारत अ विरुद्धच्या याच सामन्यात, ऑस्ट्रेलियासाठी सलामीचे इतर दावेदार देखील खेळत होते, ज्यात कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, मार्कस हॅरिस, सॅम कॉन्स्टास यांसारख्या नावांचा समावेश होता. मात्र या सर्वांना आपली छाप सोडता आली नाही. यामुळेच आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत रिकी पाँटिंगने ओपनिंगसाठी नॅथन मॅकस्वीनच्या नावाची वकिली केली होती.
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील दुसरा सामना 7 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना संपल्यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर होऊ शकतो.
