
दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले आहे. यावेळी या उजव्या हाताच्या फलंदाजाने चितगाव कसोटीत बांगलादेशविरुद्ध शानदार फलंदाजी केली. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात स्टब्सने शानदार शतक झळकावले. स्टब्सच्या कारकिर्दीतील हे पहिले शतक असून त्याने 106 धावांची इनिंग खेळली. स्टब्सने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. स्टब्सची ही खेळी खास आहे, कारण त्याचे पहिले कसोटी शतक आशियाई भूमीवर झळकले होते. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजासाठी बांगलादेशच्या कठीण खेळपट्टीवर शतक झळकावणे खरेच खूप खास आहे.
Tristan Stubbs Century : 24 वर्षीय फलंदाजाच्या शतकामुळे टीम इंडिया धोक्यात, जाणून घ्या कारण
Now Stubbs joins the party! 🎉
The 🇿🇦 batter scores his first Test 💯, laced with 3 massive sixes! 👏#BANvSAonFanCode pic.twitter.com/hTQ3woSzHo
— FanCode (@FanCode) October 29, 2024
आपल्या शतकासोबतच स्टब्सने दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर टोनी डी जॉर्जीसोबत उत्कृष्ट भागीदारी केली. या दोघांनी मिळून 201 धावा जोडल्या आणि बांगलादेशला पूर्णपणे बॅकफूटवर आणले. वृत्त लिहिपर्यंत जॉर्जीनेही शतक झळकावले होते. सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॉर्जीसह कर्णधार एडन मार्करामने संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून 69 धावा जोडल्या. मात्र, क्रीजवर सेट झाल्यानंतर एडन मार्कराम 33 धावा करून बाद झाला. तो तैजुल इस्लामचा बळी ठरला.
आता स्टब्सच्या शतकामुळे टीम इंडियाला धोका कसा निर्माण झाला हा प्रश्न आहे. ट्रिस्टन स्टब्सच्या शतकानंतर चितगाव कसोटीतही दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत आली आहे. जर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बांगलादेशविरुद्धची दुसरी कसोटीही जिंकली, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत त्यांचे स्थान अधिक मजबूत होईल. टीम इंडियाची पॉइंट टेबलमध्ये घसरण होऊ शकते. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशकडून पहिली कसोटीही जिंकली.
