सलमान खान आणि अक्षय कुमार यांचा फ्लॉपचा रेकॉर्ड मजबूत, त्यांच्यामुळे फ्लॉप होऊ नये ‘सिंघम अगेन’!


सलमान खान आणि अक्षय कुमारचे लाखो चाहते आहेत. बॉक्स ऑफिसवर जरी त्यांचे चित्रपट फारसे चालले नसले, तरी प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांची प्रतीक्षा करतात. सलमान आणि अक्षय हे दोघेही 20 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. या दोघांच्या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’मध्ये सलमान खान आणि अक्षय कुमार दिसणार आहेत. या चित्रपटात दोन्ही सुपरस्टार्सचा खास कॅमिओ असणार आहे. पण भाईजान आणि अक्कीच्या फ्लॉप चित्रपटांचा रेकॉर्ड अजय देवगणच्या चित्रपटाला काही दगाफटका करु शकतात

वास्तविक, सलमान खान चुलबुल पांडेच्या भूमिकेत बाजीराव सिंघमला सपोर्ट करताना दिसणार असल्याची चर्चा सर्वत्र आहे. सूर्यवंशी, सिम्बा आणि लेडी सिंघम हे देखील बाजीरावच्या मदतीसाठी शत्रूशी लढताना दिसणार आहेत. पण जेव्हा-जेव्हा चुलबुल पांडे आणि सूर्यवंशी एकत्र दिसले, तेव्हा तो चित्रपट बॉक्स ऑफिसच्या नदीत बुडताना दिसला.

  • मुझसे शादी करोगी – 2004 मध्ये पहिल्यांदा सलमान खान आणि अक्षय कुमार यांनी ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. 20 वर्षांपूर्वी हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी 15 कोटी रुपये खर्च केले होते. जरी या चित्रपटातून निर्मात्यांना खूप फायदा झाला. हा चित्रपट हिट झाला आणि त्याने 55.97 कोटी रुपयांची कमाई केली.
  • जान-ए-मन – 2006 साली सलमान आणि अक्षयची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतली. मात्र यावेळी प्रेक्षकांची निराशा झाली. ‘जान-ए-मन’ चित्रपटाची कथा लोकांच्या मनाला भिडली नाही. सलमान खान आणि अक्षय कुमार यांना एकत्र आणण्यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटात 40 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या चित्रपटाने 33 कोटींहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट थिएटरमध्ये फ्लॉप ठरला.
  • तीस मार खान – 2010 मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ ‘तीस मार खान’ चित्रपटात एकत्र दिसले होते. आता हे दोन्ही स्टार सलमानचे आवडते आहेत, त्यामुळे त्यांनीही या चित्रपटात स्पेशल अपिअरन्स देण्याचे मान्य केले. ज्या चित्रपटात सलमान दिसला होता, ते गाणे हिट झाले होते, पण चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला. हा चित्रपट 45 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता.
  • फुगली – सलमान खान आणि अक्षय कुमार यांनी 2014 मध्ये आलेल्या ‘फुगली’ चित्रपटात डान्स नंबर केला होता. या दोघांनीही नव्या स्टार्सना सपोर्ट करण्यासाठी स्पेशल अपिअरन्स दिला. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी 10 कोटी रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने 12 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटाचाही फ्लॉपच्या यादीत समावेश आहे.
  • सिंघम अगेन – सलमान आणि अक्षयचा ‘सिंघम अगेन’ हा पाचवा चित्रपट असेल ज्यामध्ये ते एकत्र दिसणार आहेत. मात्र, दोघांनीही हिटपेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत. अशा परिस्थितीत ही जोडी एकत्र येणे, रोहित शेट्टीसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.