
16 ऑक्टोबरच्या रात्री फेमिना मिस इंडिया 2024 चा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला होता. भारताच्या मोस्ट आयकॉनिक ब्युटी पेजंटचा हा 60 वा वर्धापन दिन होता, ज्यामध्ये मध्य प्रदेशच्या निकिता पोरवालला हा खिताब प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबईतील वरळी येथे आयोजित करण्यात आला होता. निकिता ही एक अभिनेत्री आहे, जी वयाच्या 18 व्या वर्षापासून अभिनय करत आहे. केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारी रेखा पांडे या स्पर्धेत उपविजेती ठरली.
Femina Miss India 2024 : निकिता पोरवालने पटकावला फेमिना मिस इंडियाचा खिताब, दिसणार आहे या चित्रपटात
फेमिना मिस इंडिया 2023 विजेत्या नंदिनी गुप्ताने निकिताच्या डोक्यावर मुकुट सजवला. यासोबतच नेहा धुपियाने तिचा मिस इंडिया सॅश सादर केला. या कार्यक्रमात अभिनेत्री संगीता बिजलानीने परफॉर्मन्ससह रॅम्प वॉकही केला. या कार्यक्रमात संगीता व्यतिरिक्त अभिनेत्री नेहा धुपिया आणि राघव जुयाल यांसारखे अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर दिसले. निकिताने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजन अँकर म्हणून केली होती.
फेमिना मिस इंडिया 2023 मध्ये 30 राज्यांतील विजेत्यांनी भाग घेतला. निकिताबद्दल बोलायचे झाले, तर अभिनयासोबतच तिला लेखनाचीही आवड आहे, तिने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रंगमंच नाटकांचे लेखन केले आहे. निकिताने लिहिलेल्या नाटकात 250 पानांची कृष्णलीलाही आहे. होस्टिंगसोबतच निकिताने चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचा आगामी प्रोजेक्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये आहे, त्याचा ट्रेलरही रिलीज झाला आहे, या सिनेमाचे नाव आहे ‘चंबल पार’.
निकिता पोरवाल सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही. तिच्या फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले, तर इंस्टाग्रामवर तिचे फक्त 5 हजार फॉलोअर्स आहेत. निकिता व्यतिरिक्त, फेमिना मिस इंडिया अरुणाचल प्रदेश 2024 असलेल्या तडू लुनियाला टाइम्स मिस ब्युटी विथ पर्पज अवॉर्ड मिळाला. तर फेमिना मिस इंडिया मेघालय 2024 असलेली एंजेलिया मारवीन हिला टाइम्स मिस मल्टीमीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
