
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने एका बेटिंग ॲपचा प्रचार केला आहे. त्याने सोशल मीडियावरील लोकांना ते डाउनलोड करण्यास सांगितले. गंभीरच्या या प्रमोशननंतर चाहते संतापले आणि त्याच्यावर टीका करू लागले. चाहत्यांना सर्वात जास्त राग आला, तो म्हणजे ज्या गोष्टींसाठी गंभीर कालपर्यंत इतर खेळाडूंवर टीका करायचा, आज तो स्वतःही तेच करत आहे. अनेक चाहत्यांनी त्याचे जुने व्हिडिओ आणि विधाने पोस्ट करून त्याला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.
पैशांसाठी विकले इमान… गौतम गंभीरला महागात पडली बेटिंग ॲपची जाहिरात, चाहते संतापले
Hopefully, India will continue their domination against Bangladesh in T20Is as well. Enjoy the three-match series with @Real11official. Share your opinion in a Yes/No and avail instant cash rewards.
Download Link – https://t.co/jFv1ZXcBhp
Signup Code- GAMBHIR & GET ₹100 pic.twitter.com/SFmrSCsQCt— Gautam Gambhir (@GautamGambhir) October 12, 2024
Paan masale ke AD se dikkat hai, betting vetting to chalta hai. 🤡 https://t.co/fF9XDhGwMm pic.twitter.com/asoiEloU25
— Prayag (@theprayagtiwari) October 12, 2024
गौतम गंभीर नेहमीच तंबाखू आणि बेटिंग ॲप्ससारख्या कंपन्यांच्या जाहिरातीच्या विरोधात आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होण्यापूर्वी त्याने अनेक मुलाखतींमध्ये अशाप्रकारच्या ब्रँड प्रमोशनसाठी खेळाडूंवर टीका केली होती. मात्र बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी त्याने स्वतः अशाच एका ॲपचा प्रचार केला आणि चाहत्यांना ते डाउनलोड करण्यास सांगितले. त्यामुळे चाहते संतापले. त्यांनी लगेच त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली.
Isn’t it hilarious how Gautam Gambhir lectures us about the dangers of tobacco ads, but then he’s promoting a betting app? Where’s the integrity? Where’s the goodwill for the youth? It’s like the more someone lectures, the more they’re just after that cash!
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) October 12, 2024
https://x.com/nishant_india/status/1845000542931534084?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1845000542931534084%7Ctwgr%5Eeee72ea40fe237a7798787b89481b9a78fd96289%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fgautam-gambhir-faces-backlash-from-fans-as-he-promotes-betting-app-ahead-ind-vs-ban-3rd-t20i-match-hyderabad-2882957.html
गौतम गंभीरने 2022 साली इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बीसीसीआयचा तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली याच्यावर निशाणा साधला होता. नाव न घेता तो म्हणाला होता की, ‘जेव्हा बीसीसीआयचे अध्यक्षही सट्टेबाजी ॲपचा प्रचार करत असतात, तेव्हा संघातील इतर खेळाडूंकडूनही अशी अपेक्षा केली जाऊ शकत नाही. तो म्हणाला होता की खेळाडूंनी दारू, तंबाखू, अगदी ऑनलाइन बेटिंग ॲप्सचा प्रचार करू नये. न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत, दिग्गज खेळाडूंनी पान मसाला कंपन्यांची जाहिरात करणे घृणास्पद आणि निराशाजनक म्हटले होते. वीरेंद्र सेहवाग, कपिल देव आणि सुनील गावस्कर यांसारखे अनेक खेळाडू अशा ब्रँडच्या जाहिरातीमध्ये सहभागी होते.
