
मोहम्मद शमी नुकतीच मुलगी आयराला भेटला. त्याची मुलगी आयरासोबतच्या भेटीत तो खूप भावूक दिसत होता, ज्याचा व्हिडिओही शेअर करण्यात आला होता. आता शमीची माजी पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, तिच्या मुलीच्या पासपोर्टची मुदत संपली आहे. नवीन पासपोर्टसाठी शमीची स्वाक्षरी आवश्यक आहे. त्यामुळे ती त्याला भेटायला गेली, पण शमीने सही केली नाही.
मोहम्मद शमीने बनवू दिला नाही आपल्या मुलीचा पासपोर्ट? माजी पत्नी हसीन जहाँने केले गंभीर आरोप
शमी खूप दिवसांनी त्याची मुलगी आयराला भेटला. याबाबत त्याने सोशल मीडियावर व्यथा मांडली की, जेव्हा मी माझ्या मुलीला भेटलो, तेव्हा वेळ थांबल्यासारखे वाटले. आता त्याच्या माजी पत्नीने आनंद बाजार डॉट कॉमच्या रिपोर्टमध्ये याला लबाडी म्हटले आहे. हसीन जहाँने शमीवर आरोप केला आहे की, तो कधीही आपल्या मुलीबद्दल विचारत नाही. फक्त स्वतःमध्येच व्यस्त असतो. ती म्हणाली की, ‘दोघेही महिन्याभरापूर्वी भेटले होते, पण तेव्हा त्याने पोस्ट केली नव्हती. असे दिसते की त्याच्याकडे सध्या पोस्ट करण्यासाठी काहीही नाही म्हणून हा व्हिडिओ अपलोड केला.
मोहम्मद शमी जेव्हा त्याच्या मुलीला भेटला, तेव्हा दोघेही खूप मस्ती करताना दिसले. शमीनेही आपल्या मुलीला खूप शॉपिंग करायला लावले होते. याबाबत हसीन जहाँ म्हणते की, शमी आपल्या मुलीला एका शॉपिंग मॉलमध्ये घेऊन गेला, जिथे तिला एक रुपयाही द्यावा लागत नाही. तो ज्या कंपनीची जाहिरात करतो, त्या कंपनीकडून शूज आणि कपडे खरेदी केले. आयराला गिटार आणि कॅमेरा हवा होता, पण शमीने या सर्व वस्तू दिल्या नाहीत.
हसीन जहाँने यापूर्वी मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते. तिच्या या आरोपांनंतर शमीने असे करण्याआधी आपण मरणे पसंत करू असे उत्तर दिले होते. तर इशांत शर्माने क्रिकबझवर खुलासा केला होता की बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने या प्रकरणाची चौकशी केली होती आणि खेळाडूंचे जबाब घेण्यात आले होते. इशांतने सांगितले की, त्याने अँटी करप्शन युनिटकडून शमीच्या बाजूने साक्ष दिली होती.
मोहम्मद शमी सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन करत आहे. तो लवकरच क्रिकेटमध्ये परत येऊ शकतो. रणजी ट्रॉफीनंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळण्याची शक्यता आहे.
