Jigra : आलिया भट्टच्या ‘जिगरा’चे 31 वर्षे जुने कनेक्शन, महेश भट्टच्या या चित्रपटाशी संबंधित आहे कथा!


आलिया भट्टच्या आगामी ‘जिगरा’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले, तेव्हा आलियाच्या इंटिमेट लूकने सर्वांना आकर्षित केले. आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला असून, त्यामुळे लोकांची उत्कंठा वाढली आहे. जिगराचा ट्रेलर काल म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी रिलीज झाला आहे. ज्यानंतर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. या चित्रपटात आलिया एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे, जी लोकांना खूप आवडली आहे. चित्रपटाच्या कथेत भाऊ-बहिणीचे नाते दाखवण्यात आले असून, चित्रपटात वेदांग रैना आलियाच्या भावाची भूमिका साकारत आहे.

वासन बाली दिग्दर्शित ‘जिगरा’ हा ॲक्शन थ्रिलर आहे. चित्रपटाच्या संकल्पनेला खूप दाद मिळत आहे. नुकताच या चित्रपटाशी संबंधित एक मोठा खुलासा समोर आला आहे. बॉलीवूड हंगामाच्या एका सूत्राच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे, वासन बालीच्या या चित्रपटाची कथा श्रीदेवीच्या ‘गुमराह’ या चित्रपटातून घेण्यात आली आहे. चित्रपटात अनेक बदल करण्यात आले असले, तरी चित्रपटाचे कथानक मात्र तेच आहे. 1993 मध्ये आलेल्या ‘गुमराह’ चित्रपटात श्रीदेवी, संजय दत्त आणि राहुल रॉय यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

‘गुमराह’ हा चित्रपट प्रेमाच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आला आहे. ही कथा एका मुलीवर प्रेम करणाऱ्या मुलाची आहे आणि काही कारणांमुळे ती मुलगी परदेशी तुरुंगात कैद होते. नंतर तो तिला तुरुंगातून बाहेर काढण्याचा कसा प्रयत्न करतो, हे चित्रपटात दाखवण्यात आले होते. ‘गुमराह’चा रिमेक करण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या कथेत महत्त्वाचे बदल केले, त्यातील पहिला बदल म्हणजे ‘जिगरा’मध्ये अभिनेत्री तिच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि दुसरा मोठा बदल म्हणजे हा प्रेमाचा कोन नाही, भाऊ आणि बहिणीची कथा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलिया जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहे. आदित्य नंदा, मनोज पाहवा आणि राहुल रवींद्रन हे कलाकारही या चित्रपटात काम करत आहेत.

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेल्या या चित्रपटासाठी ‘गुमराह’चे हक्क मिळवणे काही अवघड काम नव्हते, कारण ‘गुमराह’ही धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवण्यात आला होता. ‘गुमराह’चे दिग्दर्शन आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांनी केले होते आणि आता आलिया त्याच्या रिमेकमध्ये मुख्य अभिनेत्री आहे. या चित्रपटाची निर्मिती आलिया भट्ट आणि तिची बहीण शाहीन भट्ट यांच्या इटर्नल सनशाइन प्रॉडक्शनच्या प्रोडक्शन हाऊसने केली आहे.

यापूर्वी याच प्रोडक्शन हाऊसने डार्लिंगची निर्मिती केली होती. आलिया भट्टचा ‘जिगरा’ हा तिचा यावर्षी येणारा एकमेव चित्रपट आहे, जो 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या आलिया वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या ‘अल्फा’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे, ज्यामध्ये बॉबी देओल आणि शर्वरी वाघ देखील दिसणार आहेत. ‘अल्फा’ व्यतिरिक्त पुढील वर्षी आलिया संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि विकी कौशल असणार आहेत.