आमिर खानचे पुनरागमन लांबणीवर! आता राम चरणची महेश बाबू आणि शाहरुख खान यांच्याशी होणार तगडी स्पर्धा


आमिर खानच्या चाहत्यांनी त्याला 2 वर्षांपूर्वी ‘लाल सिंह चड्ढा’मध्ये पाहिले होते. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण बॉक्स ऑफिसवर ‘लाल सिंग चड्ढा’ प्रेक्षकांना आवडला नाही. चित्रपट फ्लॉप होताच आमिर खानने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. मोठ्या पडद्यापासून दूर असला, तरी आमिर खान सतत चित्रपटांशी जोडला जातो. गेल्या दोन वर्षांत आमिरने चित्रपटात काम करण्यापेक्षा चित्रपट बनवण्यावर अधिक भर दिला. मात्र अभिनेत्याच्या पुनरागमनाची बातमी येताच त्याच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आमिर खान ‘सितारे जमीन पर’मधून पुनरागमन करणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार होता, पण आता आमिरला पाहण्यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार असल्याचे दिसते.

निर्मात्यांनी आमिरच्या पुनरागमनासाठी ख्रिसमसचा आठवडा निवडला होता. पीपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, ‘सितारे जमीन पर’चे निर्माते तो पुढे ढकलू शकतात. असे झाले तर ख्रिसमसच्या आठवड्यात तीन मोठे चित्रपट एकमेकांशी भिडणार आहेत. एका बाजूला हॉलिवूडचा ‘मुफासा: द लायन किंग’, तर दुसरीकडे राम चरणचा ‘गेम चेंजर’ आणि तिसऱ्या बाजूला अक्षय कुमारचा ‘वेलकम टू द जंगल’. राम चरणचा ‘गेम चेंजर’ हा मोठा चित्रपट मानला जात असला, तरी आता त्याची थेट स्पर्धा शाहरुख खान आणि महेश बाबूसोबत होणार आहे.

‘सितारे जमीन पर’ बाबत असे बोलले जात आहे की, दिग्दर्शक आरएस प्रसन्ना या चित्रपटाचे काम वेळेवर पूर्ण करू शकणार नाहीत. याच कारणामुळे त्याला त्याचा चित्रपट पुढे ढकलावा लागणार आहे. तथापि, निर्मात्यांनी अद्याप चित्रपट पुढे ढकलल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. या वृत्तात आमिर खान चित्रपटाच्या कामावर खूश असल्याचे म्हटले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्यासाठी तो उत्सुक आहे. मात्र, या चित्रपटाला अजून वेळ हवा आहे, असेही अभिनेत्याचे मत आहे. त्यामुळे हा चित्रपट किमान तीन महिने लांबणार असल्याचे मानले जात आहे.

एकीकडे ‘सितारे जमीन पर’ पुढे ढकलल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाचे सह-निर्माते जिओ स्टुडिओ या तारखेला त्यांचा दुसरा चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार करत आहेत. वरुण धवनचा बेबी जॉन आता 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. तथापि, निर्मात्यांकडून त्याची पुष्टी देखील आलेली नाही. ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले नसल्याची बातमी अलीकडेच आली.

आता तसे पाहिले, तर राम चरणचा ‘गेम चेंजर’ आणि शाहरुख-महेश बाबूचा ‘मुफासा: द लायन किंग’ यांच्यात थेट स्पर्धा होणार आहे. एकीकडे कियारा अडवाणी राम चरणसोबत दिसणार आहे. शाहरुख खानने ‘मुफासा: द लायन किंग’च्या हिंदी व्हर्जनमध्ये डबिंग केले आहे. या चित्रपटात शाहरुखशिवाय आर्यन आणि अबरामचा आवाजही ऐकायला मिळणार आहे. तर, चित्रपटाच्या तेलगू व्हर्जनमध्ये महेश बाबूने त्याच पात्राला आवाज दिला आहे, ज्याचा व्हॉईस ओव्हर शाहरुखने हिंदीत केला आहे. अशा परिस्थितीत राम चरणला शाहरुख आणि महेश बाबूच्या चाहत्यांचा सामना करावा लागणार आहे.