Box Office Day 9: ‘स्त्री 2’चे भंगले स्वप्न! 300 कोटींची कमाई करूनही शाहरुख-रणबीर आणि सनी देओलच्या राहिली मागे


ओ स्त्री रक्षा करना… स्त्री 2 प्रदर्शित होताच, श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव अभिनीत हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये लोकप्रिय होऊ लागला. थिएटरमध्ये रिलीज होऊन आठवडा उलटला तरी ‘स्त्री 2’ अजूनही आपला ठसा उमटवत आहे. या चित्रपटासमोर अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहमच्या ‘वेद’ची अवस्था काय आहे, हेही कुणी विचारत नाही. ‘स्त्री 2’ ने गेल्या 9 दिवसात अनेक बड्या स्टार्सच्या चित्रपटांना मागे टाकले आहे. 60 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेला हा चित्रपट प्रचंड नफा कमावत आहे.

‘स्त्री 2’ हिट होण्यासाठी निर्मात्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. निर्माते आणि स्टार्सच्या मेहनतीचे फळ मिळाले असून या चित्रपटाचा ब्लॉकबस्टरच्या यादीत समावेश झाला आहे. ‘स्त्री 2’ नंतर श्रद्धा कपूर पहिली महिला अभिनेत्री ठरली आहे, जिच्या चित्रपटाने ओपनिंगवर चांगला व्यवसाय केला आहे. ‘स्त्री 2’ची संपूर्ण कथा श्रद्धा कपूरभोवती फिरते. मात्र, हॉरर कॉमेडीच्या या सिक्वेलमध्ये अनेक कॅमिओही जोडले गेले आहेत. अक्षय कुमार, तमन्ना भाटिया आणि वरुण धवन यांना ‘स्त्री 2’ मध्ये पाहण्याचा आनंद प्रेक्षकांनी घेतला आहे.

दरम्यान, ‘स्त्री 2’ ने रिलीजच्या 9व्या दिवशी किती बिझनेस केला आहे, हे देखील कळले आहे. सकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, चित्रपटाने दुस-या शुक्रवारी 16.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, त्यात आणखी किंचित वाढ होऊ शकते. या चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनवर एक नजर टाकूया.

  • पेड प्रीव्हयू रु. 8 कोटी
  • पहिल्या दिवशी 51.8 कोटी रु
  • दुसऱ्या दिवशी 31.4 कोटी रु
  • तिसऱ्या दिवशी 43.85 कोटी रु
  • चौथ्या दिवशी 55.9 कोटी रु
  • पाचव्या दिवशी 38.1 कोटी रु
  • सहाव्या दिवशी 25.8 कोटी रु
  • सातव्या दिवशी 20 कोटी रु
  • आठवा दिवस – 16.8 कोटी रु
  • नववा दिवस – 16.50 कोटी रु

आतापर्यंत एकूण कलेक्शन – 308.15 कोटी रु

‘स्त्री 2’ ने आतापर्यंत भारतात 308.15 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींचा टप्पाही पार केला आहे. पण यासोबतच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ चे स्वप्न भंगले आहे. खरं तर, 300 कोटींची कमाई करणाऱ्या सर्वात जलद चित्रपटांच्या यादीत ‘स्त्री 2’चे नाव पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, प्रचंड कमाई करूनही हा चित्रपट शाहरुख खान, रणबीर कपूर आणि सनी देओलच्या चित्रपटांना मागे टाकू शकलेला नाही.

या यादीत पहिले नाव शाहरुख खानच्या ‘जवान’चे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आणि अवघ्या 6 दिवसांत ‘जवान’ने भारतात 300 कोटींची कमाई केली होती. शाहरुखच्या ‘पठाण’ आणि रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’चे नावे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘पठाण’ आणि ‘ॲनिमल’ने 7 दिवसांत 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. सनी देओलच्या ‘गदर 2’चे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. ‘गदर 2’ ने 8 दिवसात 300 कोटींचा टप्पा ओलांडला होता. पाचव्या क्रमांकावर ‘स्त्री 2’ आहे, जो नवव्या दिवशी 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.