
सर, फक्त स्वतःला हा प्रश्न विचारा की आपल्याला खरोखरच वाहतूक नियमांचे योग्य ज्ञान आहे का? चप्पल घालून दुचाकी चालवल्यास आपल्याकडून दंड वसूल केला जाईल का?, असे अनेकांना वाटते, पण हे खरे आहे का? पकड चांगली राहावी म्हणून लोकांना कार किंवा बाईक चालवताना शूज घालण्याचा सल्ला दिला जात असला, तरी चालानच्या मुद्द्यात किती तथ्य आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत.
Traffic Challan : चप्पल घालून बाईक चालवल्यास वसूल केला जातो का दंड? जाणून घ्या काय सांगतो नियम
मोटार वाहन कायद्यात चप्पल घालून वाहन चालवण्याची खरोखरच तरतूद आहे का? आज आम्ही तुम्हाला याबाबत योग्य माहिती देणार आहोत, जेणेकरून उद्या तुम्हाला कोणी चप्पल घालून बाईक चालवताना अडवले, तर तुम्हाला तुमचे अधिकार माहिती असायला हवे.
ट्रॅफिक चालानच्या दृष्टीने नाही, पण चप्पल घालून दुचाकी चालवण्यात नक्कीच काही धोका आहे. आता तुम्ही विचाराल कसे? रस्त्यावरील अपघातादरम्यान आपल्या पायांचे रक्षण करण्यासाठी, चप्पल घालण्याऐवजी शूज घालून चालणे अधिक सुरक्षित आहे, कारण चप्पलमध्ये दुखापत होण्याचा धोका शूजपेक्षा जास्त असतो.

आता आपण या प्रश्नाबद्दल बोलूया ज्याबद्दल प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे आणि तो म्हणजे चप्पल परिधान केलेल्या स्वाराकडून आर्थिक दंड वसूल केला जाईल का? ऑफिस ऑफ नितिन गडकरींच्या X(ट्विटर) अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली गेली होती, याबाबतची माहिती दिली गेली होती, की चप्पल घालून बाईक चालवल्यास कोणत्याही प्रकारचा दंड वसूल केला जात नाही, तशी कायद्यात कोणतीही तरतूद नाही.
याशिवाय हाफ शर्ट परिधान करणे, लुंगी बनियान घालून बसणे, गाडीत अतिरिक्त बल्ब न ठेवणे आणि गाडीची काच मलिन असली, तरी आर्थिक दंड वसूल करता येणार नाही. या अधिकृत माहितीनंतर, तुम्हाला हे माहित असेलच की या प्रकरणांमध्ये जर कोणी तुमच्याकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
