आधार क्रमांक न देता करता येतील सर्व कामे, व्हर्च्युअल आयडी करेल मदत


आधार कार्ड हे भारतीय नागरिकांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. प्रत्येक कामात आधार क्रमांक द्यावा लागतो. गेल्या काही वर्षांत भारतात आधार कार्डच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आता सरकारने आधार क्रमांक देण्याची अट कमी करत आधार व्हर्च्युअल आयडी फीचर सुरू केले आहे. यामुळे केवळ आधार कार्ड सुरक्षित राहणार नाही तर फसवणुकीचा धोकाही कमी होईल. जाणून घ्या. आधार व्हर्च्युअल आयडी म्हणजे काय? आणि यातून कोणते फायदे मिळू शकतात.

आधार व्हर्च्युअल आयडी हा 16 अंकी तात्काळ क्रमांक आहे. एक प्रकारे हा आधार क्रमांकाचा पर्याय आहे. आधार व्हर्च्युअल आयडी तुम्हाला मोबाईल नंबर, बँक खाते क्रमांक यासारखी माहिती न देता तुमची ओळख प्रमाणित करण्याची परवानगी देतो. व्हर्च्युअल आयडी आधार क्रमांकावरून तयार होतो. पण व्हर्च्युअल आयडीवरून आधार क्रमांक कळू शकत नाही. प्रत्येक आधार क्रमांकावरून फक्त एक VID तयार केला जाऊ शकतो. VID किमान एक दिवस वैध असतो आणि दररोज अपडेट केला जाऊ शकतो.

UIDAI कडून याप्रमाणे तयार करा व्हर्च्युअल आधार क्रमांक 

  • UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • यानंतर, आधार सेवा विभागात जा आणि व्हर्च्युअल आयडी जनरेटरवर क्लिक करा.
  • येथे आधार क्रमांक आणि सुरक्षा कोड प्रविष्ट करा.
  • यानंतर, येथे दिसत असलेल्या ओटीपी पाठवा पर्यायावर क्लिक करा.
  • OTP टाकल्यानंतर जनरेट VID वर जा.

मेसेजद्वारे व्हर्च्युअल आयडीही तयार करता येतो
नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून, GVID नंतर आधारचे शेवटचे चार अंक लिहा आणि 1947 वर पाठवा. उदाहरण: 1947 वर GVID1234 पाठवा.

M आधार वरून असा आयडी तयार करा
M आधार ॲपवर लॉग इन करा. Generate Virtual ID च्या पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट केल्यानंतर, ओटीपी विनंतीवर क्लिक करा. OTP क्रमांक टाकल्यानंतर जनरेट VID वर क्लिक करा. तुम्हाला VID क्रमांक मिळेल.