तुमचा बॉस असा वागला तर सोडा नोकरी… भारतीय-अमेरिकन माणसाच्या सल्ल्याने उडाली खळबळ


चांगल्या कंपनीत नोकरी कशी मिळवावी, यासंदर्भात अनेक व्यावसायिक सोशल मीडियावर विविध प्रकारचे सल्ले देतात. पण आता एका भारतीय-अमेरिकन व्यावसायिकाने एक्सवर काही सल्ला दिला आहे, जो वादग्रस्त ठरला आहे. वरुणराम गणेश नावाच्या या व्यक्तीने लोकांना एवढेच सांगितले की, जर तुमच्या बॉसने असे केले, तर तुमच्या भल्यासाठी ताबडतोब नोकरीचा राजीनामा देऊन दुसऱ्या कंपनीत जाणे चांगले. पण नेटकऱ्यांना त्याचा सल्ला अजिबात आवडला नाही आणि आता ते वरुणरामला प्रचंड ट्रोल करत आहेत.

वरूणराम याने त्याच्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे तुमचा भावी बॉस मुलाखतीदरम्यान कोणत्या प्रकारची भाषा वापरतो, याचे निरीक्षण करा, असा सल्ला त्याने लोकांना दिला. बॉसने हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण वापरले, तर ती नोकरी लगेच नाकारली पाहिजे, असे त्याचे मत आहे. वरुणरामच्या मते, फक्त तोच व्यवस्थापक निवडा जो पूर्णपणे इंग्रजीत बोलतो.


त्या व्यक्तीच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या, अनेक लोक असहमत होते आणि त्याला तर्कहीन म्हणत होते. लोकांनी त्याच्या सल्ल्याची खिल्ली उडवली आणि सांगितले की, एखाद्याच्या वागण्याचा त्याच्या भाषेशी काहीही संबंध नाही. तसेच चांगला बॉस असण्याचा भाषेशी संबंध नसतो आणि अनेक चांगले बॉस हिंदी देखील बोलतात यावर भर दिला.

एका युजरने कमेंट केली, तुमची विचारसरणी असे दर्शवते की तुम्ही समाजाच्या खालच्या 90% लोकांपासून दूर आहात. त्याचवेळी आणखी एका यूजरने लिहिले की, मी इंटरनेटवर असा बालिश सल्ला यापूर्वी कधीच पाहिला नाही. एवढा भार का उचलतो आहे भाऊ? माणसाच्या वागण्याशी भाषेचा काहीही संबंध नसतो. दुसऱ्या युजरने कमेंट केली की, अरे भाऊ, या बेताल सल्ल्यामागे काय तर्क आहे, ते तुम्ही सांगितले नाही? दुसऱ्या यूजरने लिहिले, आजकाल लोक कोणत्याही गोष्टीवर सल्ला देऊ लागले आहेत.