आपल्या झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पृथ्वी शॉला टीम इंडियातून वगळण्यात आले असले, तरी हा खेळाडू आपल्या बॅटने कहर करत आहे. पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमधील एकदिवसीय चषक स्पर्धेत नॉर्थम्प्टनशायरकडून खेळत असून या संघासाठी त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. पृथ्वी शॉने रविवारी आपल्या संघाला 130 धावांनी मोठा विजय मिळवून दिला आणि यात त्याचे योगदान 72 धावांचे होते. शॉने या स्पर्धेत अर्धशतकांची हॅट्ट्रिक केली.
44 चौकार, 4 षटकार… पृथ्वी शॉने 294 धावा करून केला कहर, गौतम गंभीरकडून मिळणार का न्याय?
पृथ्वी शॉने एकदिवसीय सामन्यात शानदार फलंदाजी करत आपल्या संघासाठी सर्वाधिक 294 धावा केल्या. शॉने गेल्या तीन डावांत अर्धशतके झळकावली आहेत, त्यापैकी एकदा त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. शॉने या स्पर्धेत 44 चौकार आणि 4 षटकार मारले असून त्याची फलंदाजीची सरासरीही 58.80 आहे. शॉने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत, जरी त्याच्या संघाने आतापर्यंत 5 पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.
Prithvi Shaw runs. Metro Bank heritage.
97 of the best against Durham.
Here's every boundary. pic.twitter.com/kGMXDk1wIG
— Metro Bank One Day Cup (@onedaycup) August 2, 2024
पृथ्वी शॉ जवळपास तीन वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. चार वर्षांपूर्वी त्याला कसोटीत संधी मिळाली, मात्र तो ज्या प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे, ते पाहता आता सर्वांचे लक्ष या खेळाडूकडे असेल असे वाटते. शॉला विशेषत: नवीन मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडून अपेक्षा असतील, जो नेहमीच त्याच्या खेळाचा चाहता आहे. गौतम गंभीरने गेल्या वर्षी एका मुलाखतीत त्याचे वर्णन T20 फॉरमॅटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून केले होते. गंभीरने तर पृथ्वी शॉ टी-20 फॉरमॅटमध्ये गिलपेक्षा सरस असल्याचे म्हटले होते.