
मोहम्मद शमीने वनडेच्या 100 डावात 195 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषकातील त्याचे आकडे कोणालाही आश्चर्यचकित करू शकतात. एकदिवसीय विश्वचषकाच्या केवळ 18 डावात त्याने 55 विकेट्स घेतल्या आहेत. एवढेच नाही तर विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत त्याने वसीम अक्रमसारख्या महान गोलंदाजाला मागे टाकले असून तो यादीत पाचव्या स्थानावर आहे. असे असूनही 2019 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध विराट कोहलीने त्याला बाहेर ठेवले होते. तर शमीने या स्पर्धेत केवळ 3 सामने खेळून 13 बळी घेतले होते. आता शमीने या अन्यायाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.
विराट कोहली-रवी शास्त्रींनी केला का शमीवर अन्याय? वेगवान गोलंदाजाने उपस्थित केले मोठे प्रश्न
मोहम्मद शमीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यावेळी त्याने 2019 च्या विश्वचषकाबाबत आपली असहायता व्यक्त केली. शमीने सांगितले की, एक प्रश्न त्याच्या मनात नेहमीच राहतो. प्रत्येक संघ कामगिरी करणाऱ्या खेळाडूची निवड करतो. त्याने 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या, त्याच्याकडून आणखी काय हवे होते. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात चमक दाखवणारा शमी पुढे म्हणाला की जेव्हा त्याच्या हातात चेंडू असेल, तेव्हाच तो आपले कौशल्य दाखवू शकतो. त्याला संधी मिळाली नाही, तर तो काय करेल? शमीच्या नाराजीवर त्याला विचारण्यात आले की, त्याने व्यवस्थापनाला कधी प्रश्न विचारला आहे का? यावर शमी म्हणाला की त्याला त्याची गरज नाही, ज्यांना त्याच्या कौशल्याची गरज आहे, त्यांनी स्वत: बोलले पाहिजे.
Mohammad Shami taking a dig at kohli-shastri politics for excluding him from 2019 wc semifinal 👏 pic.twitter.com/GJxP78vkrI
— Dev 🇮🇳 (@time__square) July 19, 2024
मोहम्मद शमी 2019 मध्ये फक्त 4 सामने खेळू शकला होता, तर त्याला 4-5 सामन्यांमध्ये बाहेर ठेवण्यात आले होते. या 4 सामन्यात त्याने 14 विकेट घेतल्या. या काळात कोहली कर्णधाराच्या भूमिकेत होता आणि रवी शास्त्री संघाचे प्रशिक्षक होते. त्याचप्रमाणे 2023 च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये त्याला बेंचवर ठेवण्यात आले होते. यानंतर हार्दिक पांड्या जखमी झाल्याने त्याला संघात घेण्यात आले.
रोहित आणि विराटला नेट सेशनमध्ये आमचा सामना करायला आवडत नाही, असा खुलासाही शमीने यावेळी केला. रोहित थेट म्हणतो की तो शमीचा सामना करणार नाही. तर विराट दोनदा आऊट झाल्यावर चिडतो. शमीने असेही सांगितले की, तो आणि विराट नेहमीच एकमेकांना आव्हान देत असतात.
