
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter (आता X) शी स्पर्धा करण्यासाठी, देसी ॲप कू वापरकर्त्यांसाठी आणले गेले. चार वर्षांपूर्वी आलेले कू ॲप लोकांना फारसे आवडले नाही, त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून कंपनी बाजारात टिकून राहण्यासाठी धडपडत होती, मात्र आता अखेर कंपनीने कू ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
Koo App : देसी ट्विटर ॲप कू होणार बंद, कंपनीच्या संस्थापकाने लिंक्डइनवर केली आहे ही पोस्ट
खूप दिवसांपासून Koo ॲपच्या अधिग्रहणाची चर्चा होती, पण हे प्रकरण प्रत्यक्षात आले नाही. कू कंपनीचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी अलीकडेच LinkedIn वर एका पोस्टमध्ये माहिती दिली की आम्ही अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या, समूह आणि मीडिया हाऊसशी चर्चा केली, परंतु आम्हाला हवे तसे परिणाम मिळाले नाहीत.
2020 मध्ये लाँच केलेले Koo ॲप ही पहिली भारतीय मायक्रोब्लॉगिंग साइट होती, जी वापरकर्त्यांसाठी 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध होती. आत्तापर्यंत हे ॲप 60 दशलक्ष म्हणजेच 6 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहे.
Koo ॲपबद्दल बोलायचे झाले, तर ते बंद होण्यापूर्वी कंपनीच्या सह-संस्थापकांनी ॲपबद्दल काही महत्त्वाची माहिती देखील शेअर केली आहे. उदाहरणार्थ, Koo ॲपवर दर महिन्याला 10 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते, 2.1 दशलक्ष दैनिक सक्रिय वापरकर्ते, दरमहा 10 दशलक्ष पोस्ट आणि 9 हजारांहून अधिक VIP खाती होती.
रिपोर्ट्सनुसार, कू ॲपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून टाळेबंदीची प्रक्रिया सुरू होती. एप्रिल 2023 मध्ये कंपनीने आपल्या सुमारे एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला होता.
Koo ने देखील Accel आणि Tiger Global सारख्या गुंतवणूकदारांकडून $60 दशलक्ष पेक्षा जास्त निधी उभारला होता, परंतु असे असूनही कंपनी लोकांना लोकांच्या हृदयात स्थान मिळवू शकली नाही, जी Twitter ने वर्षानुवर्षे निर्माण केली होती. कदाचित यामुळेच ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी आलेल्या कू या कंपनीला पॅकअप करण्याची वेळ आली आहे.
