Box Office Collection : पाहात राहिले पठाण-जवान आणि अॅनिमल, सहाव्या दिवशी प्रभासच्या चित्रपटाने मोडला हा विक्रम


बॉक्स ऑफिसवर ‘कल्की 2898 एडी’चे यश सातत्याने पाहायला मिळत आहे. पॅन इंडियाचा स्टार प्रभास स्टारर या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्वजण अमिताभ बच्चन यांचे कौतुक करताना दिसत आहेत. दीपिका पादुकोणच्या व्यक्तिरेखेलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. कमल हासनची छोटीशी भूमिकाही लोकांच्या मनात घर करून आहे. चित्रपटात अनेक मजेदार घटक जोडले गेले आहेत. अनेक स्टार्सच्या कॅमिओचाही समावेश करण्यात आला आहे. ‘कल्की 2898 एडी’ हा पूर्णपणे मसालेदार चित्रपट आहे.

पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत ‘कल्की 2898’ पाहण्यासाठी थिएटरबाहेर लोकांची गर्दी असते. या पॅन इंडिया चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत दररोज नवनवीन विक्रम होत आहेत. 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘कल्की 2898 एडी’ने त्याची किंमत वसूल केली आहे. आता चित्रपटाच्या पुढील कमाईत नफ्याची भर पडणार आहे. आठवड्याच्या मध्यावरही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. प्रभासच्या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊया.

सकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, ‘कल्की 2898 एडी’ ने रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या मंगळवारी 27.85 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामध्ये या चित्रपटाने तेलुगूमध्ये 11.2 कोटी, तमिळमध्ये 1.2 कोटी, हिंदीमध्ये 14 कोटी, कन्नडमध्ये 0.25 कोटी आणि मल्याळममध्ये 1.2 कोटींचा व्यवसाय केला आहे. भारतात आतापर्यंत चित्रपटाचे एकूण कलेक्शन 371 कोटींवर पोहोचले आहे. एकट्या तेलुगूत ‘कल्की 2898 एडी’ने 6 दिवसात 193.2 कोटी रुपये कमवले आहेत. तमिळमध्ये आतापर्यंत या चित्रपटाचे कलेक्शन 21 कोटी रुपये असून हिंदीमध्ये चित्रपटाचे कलेक्शन 142 कोटी रुपये झाले आहे.

‘कल्की 2898 एडी’ने सहाव्या दिवशी कमाईच्या बाबतीत पठाण-जवान आणि अॅनिमलला मागे टाकले आहे. ‘कल्की 2898 एडी’ रिलीजच्या सहाव्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.

  • बाहुबली 2 ने रिलीजच्या सहाव्या दिवशी 26 कोटींचा व्यवसाय केला होता.
  • रणबीर कपूरच्या ॲनिमलने सहाव्या दिवशी 27.8 कोटींची कमाई केली होती.
  • धूम 3 ने सहाव्या दिवशी 24.57 कोटींची कमाई केली होती.
  • शाहरुखच्या पठाणने सहाव्या दिवशी 25.5 कोटींची कमाई केली होती.
  • ‘जवान’ने रिलीजच्या सहाव्या दिवशी 24 कोटींचा व्यवसाय केला.