
गेले वर्ष सलमान खानसाठी काही खास नव्हते. त्याचे दोन मोठे चित्रपट थिएटरमध्ये आले आणि विशेष काही करू शकले नाही. ‘किसी का भाई किसी का जान’ ला लोकांचा थंड प्रतिसाद मिळाला, तर ‘टायगर 3’ कडून अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत. सध्या बॉलिवूडच्या भाईजानने त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. एआर मुरुगदास यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘सिकंदर’मध्ये तो लवकरच दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. साजिद नाडियादवाला या चित्रपटाची निर्मिती करत आहे. 2025 या वर्षासाठी त्यांनी मोठ्या योजना आखल्या आहेत.
अक्षय कुमारच्या पुढील मोठ्या चित्रपटात होणार बॉबी देओल, जॉन अब्राहम आणि अर्जुन रामपालची एंट्री ?
खरं तर, 2025 हे वर्ष साजिद नाडियाडवालासाठी ब्लॉकबस्टर ठरणार आहे. त्यासाठी त्याने मोठे नियोजनही केले आहे. ‘सिकंदर’ व्यतिरिक्त पुढील वर्षी येणारा त्याचा दुसरा चित्रपट म्हणजे अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’. आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.
बॉक्स ऑफिस वर्ल्ड वाईड डॉट कॉममध्ये नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. साजिद नाडियादवालाने बकरीद 2025 साठी अक्षय कुमारचा ‘हाऊसफुल 5’ शेड्यूल केल्याचे समोर आले आहे. जो बॉलिवूड आणि अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी डबल धमाका असणार आहे. तर सलमान खानचा ‘सिकंदर’ 2025 च्या ईदला रिलीज होणार आहे. म्हणजे एकूणच नाडियाडवाला बॅक टू बॅक हिट्सने बॉक्स ऑफिसवर थैमान घालणार आहे.
‘हाऊसफुल’ फ्रँचायझीचा हा पाचवा भाग असेल. या चित्रपटात अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख दिसणार आहेत. याआधी या चित्रपटात अनिल कपूरची उपस्थिती असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. त्यानंतर फीबाबत असंतोष असल्याने त्याने चित्रपट सोडल्याचे समोर आले. मिड डेच्या वृत्तानुसार, अर्जुन रामपाल, जॉन अब्राहम आणि बॉबी देओल यांना या भागात परत आणण्याबाबतही चर्चा सुरू आहे. चित्रपटात खलनायक आणि नायक यांच्यात चुरशीची स्पर्धा दाखवण्यात येणार आहे.
