
अशी कल्पना करा की तुम्ही एका मुलीच्या पहिल्या नजरेत प्रेमात पडला आहात. तुम्ही तिच्याशी लग्नही केले. पण काही दिवसांनी तुम्हाला कळेल की ती मुलगी नसून मुलगा आहे, मग तुमची अवस्था काय होईल? साहजिकच ‘कापले तरी रक्त नाही’ अशी परिस्थिती असेल. असेच काहीसे एका इंडोनेशियन माणसासोबत घडले, ज्याने नुकतेच आपल्या मैत्रिणीशी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. मात्र नवविवाहित पत्नी घरी येताच एक कांड झाले.
मोठ्या थाटामाटात गर्लफ्रेंडसोबत केले लग्न, मग पत्नीचे असे सत्य समोर आले, ज्यामुळे पतीला बसला धक्का
ऑडिटी सेंट्रलच्या वृत्तानुसार, एका 26 वर्षीय व्यक्तीने पोलिसांना असे सांगून धक्का दिला की जिला वधू असल्याचे समजून, ज्या व्यक्तीला घरी आणले होते, तो मुलगा आहे. म्हणजे त्याची फसवणूक झाली आहे. आता तुम्ही विचार करत असाल की जेव्हा पहिल्या नजरेत प्रेम झाले, तेव्हा ती व्यक्ती कोण होती, समोरच्या व्यक्तिला माहित नव्हते का? हा गोंधळ कसा झाला ? आम्ही तुम्हाला सांगतो.
त्या व्यक्तीने सांगितले की तो तिला इंटरनेटवर भेटला होता. काही दिवस एकमेकांना ऑनलाइन डेट केल्यानंतर दोघांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. तो माणूस म्हणतो की त्या मुलीला पाहताच तो पहिल्याच नजरेत प्रेमात पडला. यानंतर त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्यावेळी त्या माणसाला आपल्या जोडीदाराबद्दल काहीतरी विचित्र वाटले होते, पण तो प्रेमात बुडालेला असल्यामुळे, ती पुरुष असल्याची शंका त्याला कधीच आली नाही.
मुलीने तिचे नाव आदिंदा कांजा अज्जहरा असे सांगितले. ती नेहमी हिजाबमध्ये असायची. त्या माणसाला तिची शैली खूप आवडली, कारण तो तिला लाजाळू मानत होता. पण त्रास तेव्हा सुरू झाला, जेव्हा तिने लग्नानंतरही चेहरा लपवला. इतकेच नाही तर कुणासमोरही जाण्यासाठी ती संकोच करायची.
आपल्या नवविवाहित पत्नीचे असे वागणे पाहून तो माणूस अस्वस्थ झाला. यानंतर त्यांनी चौकशी केली असता, सत्यता समजल्यावर त्यांना धक्काच बसला. कारण, तो आजवर ज्याला आपली बायको समजत होता, खरे, तर तो मुलगी असल्याचे भासवून त्याला मूर्ख बनवणारा मुलगा होता. या व्यक्तीच्या तक्रारीवरून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक प्रकरणात त्याला चार वर्षांची शिक्षाही होऊ शकते.
