
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक कधी त्याच्या गोलंदाजीमुळे, तर कधी फलंदाजीमुळे चर्चेत होता. पण आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. हा पाकिस्तानी खेळाडू सध्या क्रिकेटमुळे नाही, तर वैयक्तिक आयुष्यातील गोंधळामुळे चर्चेत आहे. अलीकडेच शोएब मलिकचा सानिया मिर्झापासून घटस्फोट झाला असून त्याने तिसरे लग्नही केले आहे. लग्नानंतर शोएब मलिकचे जुने व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहेत आणि त्याचा असाच एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.
Shoaib Malik Video : 5 नाही तर 500 मुली आहेत… सानियापासून घटस्फोट घेतल्यानंतर शोएब मलिकचा बरळलेला व्हिडिओ व्हायरल
शोएब मलिकचा हा व्हिडिओ एका टॉक शोचा आहे, ज्यामध्ये शोएब अख्तर त्याला काही प्रश्न विचारत आहे. शोएब अख्तरने त्याला विचारले की त्याच्या आवडत्या 5 मुली कोण आहेत, त्यावर शोएबने उत्तर दिले – 5 नाही, 500 मुली आहेत. शोएब पुढे म्हणतो की, कोणत्याही 5 मुलींची नावे घेतली, तर बाकीच्यांना वाईट वाटेल. एवढेच नाही तर शोएबने सांगितले की त्याची मुलांपेक्षा मुलींशी जास्त मैत्री आहे.
अलीकडेच, पाकिस्तानी मीडिया रिपोर्टमध्ये उघड झाले आहे की शोएब मलिक सना जावेदसोबत गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सनाचे तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. म्हणजे लग्नानंतर लगेचच किंवा त्याच्या काही दिवस आधीपासून ती शोएब मलिकवरही प्रेम करू लागली. सानिया आणि तिच्या कुटुंबीयांना शोएब मलिकच्या गेल्या तीन वर्षांपासूनच्या कृत्यांची माहिती होती, असा दावाही अहवालात करण्यात आला आहे. शोएबच्या कुटुंबीयांना गेल्या वर्षीच याची माहिती मिळाली. शोएबला खूप समजावले, पण तो मान्य झाला नाही आणि शेवटी तो सानियापासून वेगळा झाला.
