
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आधी तिसरे लग्न आणि नंतर सानिया मिर्झाशी घटस्फोट अशा बातम्यांनी शोएब मलिक चर्चेत राहिला आणि दरम्यान आता त्याच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप होत आहेत. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (बीपीएल) एकाच षटकात तीन नो बॉल टाकल्यानंतर शोएब मलिक फिक्सिंगच्या आरोपांचा बळी ठरला, मात्र आता सर्व आरोपांवर शोएब मलिकचे वक्तव्य आले आहे.
पैशासाठी लीग सोडली, फिक्सिंगसाठी नाही! शोएब मलिकने आता सांगितले सत्य
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने ट्विटर (एक्स) वर अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्याने लिहिले की, बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये फॉर्च्यून बारिशालबद्दल पसरलेल्या अफवा आणि बातम्यांवर मी काही गोष्टी सांगू इच्छितो. लीग सोडण्यापूर्वी मी संघाचा कर्णधार तमीम इक्बालशी सविस्तर चर्चा केली. मला बांगलादेश सोडावे लागले, कारण दुबईत माझ्या आधीच काही मीडिया कमिटमेंट होत्या.
Official statement ;
I would like to address and dismiss the recent rumors circulating about my playing position with Fortune Barishal. I had a thorough discussion with our captain, Tamim Iqbal, and we mutually planned the way forward. I had to leave Bangladesh for a… pic.twitter.com/kmPqPt1nxv— Shoaib Malik 🇵🇰 (@realshoaibmalik) January 26, 2024
आगामी सामन्यासाठी मी संघाचे अभिनंदन करतो, आगामी सामन्यात माझी गरज भासल्यास मी मदत करण्यास तयार असल्याचे शोएब मलिक म्हणाला. या संघासोबत खेळण्याचा मला नेहमीच आनंद वाटतो. अशा अफवा पसरवू नका, असे आवाहन शोएब मलिकने केले आहे, कारण यामुळे एखाद्याच्या करिअरमध्ये फरक पडू शकतो आणि एखाद्याच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते.
वास्तविक, हा गोंधळ तेव्हा सुरू झाला, जेव्हा फॉर्च्यून बारिशाल आणि खुलना टायगर्स यांच्यातील सामन्यात पॉवरप्लेमध्ये शोएब मलिकने गोलंदाजी केली, त्यानंतर एकाच षटकात तीन नो बॉल टाकले. T-20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात तीन नो बॉल टाकणारा शोएब मलिक पहिला गोलंदाज ठरला आहे. मात्र, आता खुद्द शोएब मलिकने या अफवांना पूर्णविराम देत या वक्तव्याद्वारे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
